Palm trees

Saturday, August 19, 2006

Sunday, August 06, 2006

प्रेम

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही,
जीव जेवढा आपण लावावा......
तेवढा सर्वच लावतात असे नाही.

प्रेमासारख बंधन ज्याला सीमा नसतात हे आपण जाणतो,
पण प्रेमासारख्या बंधनाला सर्वच जाणतात असे नाही.

कुणीतरी म्हंटलय प्रेमामध्ये हातवरील रेशांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पण त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही.

Friday, August 04, 2006

प्रेमाचं BEVERAGE

CENTRAL NERVOUS SYSTEM माझी केलीस तु DAMAGE,
बदलुन टाकलीस तु माझी भोळीभाबडी IMAGE
कशाचीच नव्हती एवढी आता आहे तुझी CRAZE
आयुष्याचा माझ्या चालु आहे हा SENSITIVE PHASE
कुठेही पाहता दिसे मज फक्त तुझीच IMAGE
बोलायला तुझ्याशी आणतो मी उसनं COURAGE
तुझे प्रेम म्हणजे एक ALCOHOLIC BEVERAGE
सुंदर रंगीत पक्ष्याचे मखमली PLUMAGE
VALENTINE'S DAYला देशील म्हटलं सुंदरसं PACKAGE
नाही मिळालं काही तेव्हा हृदयास लावले BANDAGE
तुझ्यानंतर होणार नाही प्रिये कोणाशी ENGAGE
माझ्यासाठी रिता ठेव तुझ्या हृदयाचा PASSAGE
नाही माझा मोठा बंगला आहे छोटं COTTAGE
प्रेमामाखातर करशील का तू देत्यामध्ये MANAGE
चटकन दे होकर आणि भर आयुष्याचं PAGE
विलंब करु नकोस राणी होईल आमचं AGE....
होईल आमचं AGE...

साभार: मराठी मस्ती ग्रुप मैत्रीण

Thursday, August 03, 2006

लष्कर ए क्रिकेट


हिंदुस्थानी क्रिकेट संघ श्रीलंकेत खेळायला चालला आहे कि लढायला चालला आहे? वरील फोटो पहा.....
परवा बंगळूरच्या कॅम्पच्या वेळी हिंदुस्थानी खेळाडूंना सैनिकी शिक्षण दिलं.

Wednesday, August 02, 2006

दाखल होतेय आणखी एक मराठमोळी वाहिनी

निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या वाहिनीविषयी...निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. "सब', "जनमत' आणि आता "मी मराठी' असा अधिकारी बंधूंचा छोटा पडद्यावरील प्रवास थक्क करणारा आहे. "आपल्या माणसांची आपली वाहिनी' असे या नव्या वाहिनीचे घोषवाक्‍य आहे. या वाहिनीच्या पूर्वतयारीच्या कामात कांचन अधिकारी सध्या गढून गेल्या आहेत. "क्‍लास आणि मास' या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्याप्रमाणे मालिका व कार्यक्रम बनविण्यात येणार आहेत. "मोगरा फुलला', "दोष ना कुणाचा', "दावत', "दे दणादण', "धरलं तर चावतं सोडलं तर पळतं', "दोन फूल एक डाऊट फूल'... अशा काही मालिका व कार्यक्रम हे त्यांच्या वाहिनीचे प्रमुख आकर्षण आहे. "मी मराठी' वाहिनीमुळे अधिकारी बंधूंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखून तशा प्रकारच्या मालिका बनविण्यात अधिकारी बंधूंचा हातखंडा राहिला आहे. बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्‍टर, दामिनी... अशा काही त्यांच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या मालिकांमुळेच किती तरी कलाकार नावारूपास आलेले आहेत. "मी मराठी' हे अधिकारी बंधूंचे छोट्या पडद्यावरील एक वेगळे पाऊल आहे. कांचन अधिकारी याबाबत म्हणतात, ""चोवीस तास मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी "मी मराठी' ही वाहिनी असावी ही कल्पना मुळात मार्कंड अधिकारी यांची; कारण तसं पाहायला गेले, तर अधिकारी बंधूंचे पहिल्यापासून मराठीवर प्रेम जडलेले आहे. "सब' व जनमत' या स्वतंत्र दोन वाहिन्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळेच "मी मराठी' वाहिनी लॉंच करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चॅनेलच्या प्रोग्रॅम डिझायनिंगची सर्वस्वी जबाबदारी मी उचलली आहे. त्यात एकूण चार वयोगटांचा येथे प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. पहिला गट लहान मुलांचा असेल. दुसरा खास तरुणांसाठी, तिसरा मध्यमवर्गीय माणसांसाठी, तर चौथा वरिष्ठ नागरिकांसाठी. यामध्ये शहरी; तसेच ग्रामीण प्रेक्षकवर्गाचा विचार करण्यात आला आहे.''