Palm trees

Saturday, June 02, 2007

थोडक्यात सामान्य ज्ञान...

  • तांबे या धातूपासून शस्त्रे बनविण्याची कला ८००० वर्षापूर्वी विकसित झाली.
  • महावीर प्रसाद जैन नावाच्या हिंदुस्तानी मनुष्याने आँक्सफर्ड डिक्शनरीतील ८०,००० शब्द पाठ करण्याचा विक्रम केला.
  • राजपूत रेजिमेंटची स्थापना १८१७ साली बडोद्यात झाली.
  • संयुक्त राज्य अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या खॆळाडुंना 'ग्लेटर' (मगर) असे म्हणून संबोधण्याची प्रथा अजूनही तशीच सुरु आहे.
  • आँकिर्टक महाद्वीपमध्ये १९६० साली वसलेल्या १६५ रहिवाशांच्या 'इनुअत' या नावाचा स्थानिक अर्थ आहे लोक.
  • युध्द, नैसर्गिक आपत्ती यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तिंना तत्काळ मदत पोहोचविणाया 'रेड क्राँस ' या संस्थेची स्थापना २२ आँगस्ट १८६४ रोजी जिनेव्हा येथे हेनरी दुनांत यांच्या प्रयत्नांमुळे झाली.
  • बीबीसीची रेडिओ सेवा इंग्रजीशिवाय ४२ विविध भाषांमध्ये दररोज आपला कार्यक्रम प्रसारित करते.
  • पृथ्वीवरून कोणत्याही वेळी चंद्र पाहिल्यास त्याचा ४१% भागदेखील आपल्याला दिसत नाही.
  • अमेरिकेतील केटुंकी येथे तुम्ही तुमच्या मागच्या खिशातून आइस्क्रिम वाहून नेणे हे बेकायदेशिर आहे.
  • उणे ४० अंश सेल्सिअस हे तापमान उणे ४० अंश फँरनहाइटच्या समान आहे.
  • आइसलँडमध्ये हाँटेलमधील वेटरला टीप देणे हा अपमान समजला जातो

No comments: