Palm trees

Saturday, July 03, 2010

Saturday, June 02, 2007

थोडक्यात सामान्य ज्ञान...

  • तांबे या धातूपासून शस्त्रे बनविण्याची कला ८००० वर्षापूर्वी विकसित झाली.
  • महावीर प्रसाद जैन नावाच्या हिंदुस्तानी मनुष्याने आँक्सफर्ड डिक्शनरीतील ८०,००० शब्द पाठ करण्याचा विक्रम केला.
  • राजपूत रेजिमेंटची स्थापना १८१७ साली बडोद्यात झाली.
  • संयुक्त राज्य अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या खॆळाडुंना 'ग्लेटर' (मगर) असे म्हणून संबोधण्याची प्रथा अजूनही तशीच सुरु आहे.
  • आँकिर्टक महाद्वीपमध्ये १९६० साली वसलेल्या १६५ रहिवाशांच्या 'इनुअत' या नावाचा स्थानिक अर्थ आहे लोक.
  • युध्द, नैसर्गिक आपत्ती यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तिंना तत्काळ मदत पोहोचविणाया 'रेड क्राँस ' या संस्थेची स्थापना २२ आँगस्ट १८६४ रोजी जिनेव्हा येथे हेनरी दुनांत यांच्या प्रयत्नांमुळे झाली.
  • बीबीसीची रेडिओ सेवा इंग्रजीशिवाय ४२ विविध भाषांमध्ये दररोज आपला कार्यक्रम प्रसारित करते.
  • पृथ्वीवरून कोणत्याही वेळी चंद्र पाहिल्यास त्याचा ४१% भागदेखील आपल्याला दिसत नाही.
  • अमेरिकेतील केटुंकी येथे तुम्ही तुमच्या मागच्या खिशातून आइस्क्रिम वाहून नेणे हे बेकायदेशिर आहे.
  • उणे ४० अंश सेल्सिअस हे तापमान उणे ४० अंश फँरनहाइटच्या समान आहे.
  • आइसलँडमध्ये हाँटेलमधील वेटरला टीप देणे हा अपमान समजला जातो

Tuesday, October 31, 2006

"जम्बो" आत आणि "रावण" बाहेर

काय गोंधळून गेलात? तुम्हाला काही लक्षात आले का? अहो आजच्या एका वर्तमानपत्रातील हि ठळक बातमी आहे. आणि हो जम्बो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे... चला मिच सांगतो, जम्बो म्हणजे आपला अनिल.. हो अनिल कुंबळेच! पण आता पुढची पंचायत आहे ना! हा "रावण" कोण........? येतंय का लक्षात? नाही येणार कदाचित कारण हे खुप कमी लोकांना माहित आहे कि, हे रमेश पोवारचे टोपणनाव आहे. अगदी विचित्र आहे हे सगळं! पण खरच मनापासून वाईट वाटत की आपल्या कर्णलसाहेबांनी(दिलीप वेंगसरकर) त्याला टिममधून काढलं.

Saturday, August 19, 2006

Sunday, August 06, 2006

प्रेम

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही,
जीव जेवढा आपण लावावा......
तेवढा सर्वच लावतात असे नाही.

प्रेमासारख बंधन ज्याला सीमा नसतात हे आपण जाणतो,
पण प्रेमासारख्या बंधनाला सर्वच जाणतात असे नाही.

कुणीतरी म्हंटलय प्रेमामध्ये हातवरील रेशांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पण त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही.

Friday, August 04, 2006

प्रेमाचं BEVERAGE

CENTRAL NERVOUS SYSTEM माझी केलीस तु DAMAGE,
बदलुन टाकलीस तु माझी भोळीभाबडी IMAGE
कशाचीच नव्हती एवढी आता आहे तुझी CRAZE
आयुष्याचा माझ्या चालु आहे हा SENSITIVE PHASE
कुठेही पाहता दिसे मज फक्त तुझीच IMAGE
बोलायला तुझ्याशी आणतो मी उसनं COURAGE
तुझे प्रेम म्हणजे एक ALCOHOLIC BEVERAGE
सुंदर रंगीत पक्ष्याचे मखमली PLUMAGE
VALENTINE'S DAYला देशील म्हटलं सुंदरसं PACKAGE
नाही मिळालं काही तेव्हा हृदयास लावले BANDAGE
तुझ्यानंतर होणार नाही प्रिये कोणाशी ENGAGE
माझ्यासाठी रिता ठेव तुझ्या हृदयाचा PASSAGE
नाही माझा मोठा बंगला आहे छोटं COTTAGE
प्रेमामाखातर करशील का तू देत्यामध्ये MANAGE
चटकन दे होकर आणि भर आयुष्याचं PAGE
विलंब करु नकोस राणी होईल आमचं AGE....
होईल आमचं AGE...

साभार: मराठी मस्ती ग्रुप मैत्रीण

Thursday, August 03, 2006

लष्कर ए क्रिकेट


हिंदुस्थानी क्रिकेट संघ श्रीलंकेत खेळायला चालला आहे कि लढायला चालला आहे? वरील फोटो पहा.....
परवा बंगळूरच्या कॅम्पच्या वेळी हिंदुस्थानी खेळाडूंना सैनिकी शिक्षण दिलं.