Palm trees

Wednesday, August 02, 2006

दाखल होतेय आणखी एक मराठमोळी वाहिनी

निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या वाहिनीविषयी...निर्मात्या, कलाकार, दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणखी एका मोठ्या जबाबदारीतून प्रेक्षकांपुढे येणार आहेत. "मी मराठी' या आगामी वाहिनीच्या त्या सर्वेसर्वा आहेत. पूर्णतः निःशुल्क असलेली ही वाहिनी सप्टेंबरपासून २४ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. "सब', "जनमत' आणि आता "मी मराठी' असा अधिकारी बंधूंचा छोटा पडद्यावरील प्रवास थक्क करणारा आहे. "आपल्या माणसांची आपली वाहिनी' असे या नव्या वाहिनीचे घोषवाक्‍य आहे. या वाहिनीच्या पूर्वतयारीच्या कामात कांचन अधिकारी सध्या गढून गेल्या आहेत. "क्‍लास आणि मास' या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्याप्रमाणे मालिका व कार्यक्रम बनविण्यात येणार आहेत. "मोगरा फुलला', "दोष ना कुणाचा', "दावत', "दे दणादण', "धरलं तर चावतं सोडलं तर पळतं', "दोन फूल एक डाऊट फूल'... अशा काही मालिका व कार्यक्रम हे त्यांच्या वाहिनीचे प्रमुख आकर्षण आहे. "मी मराठी' वाहिनीमुळे अधिकारी बंधूंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखून तशा प्रकारच्या मालिका बनविण्यात अधिकारी बंधूंचा हातखंडा राहिला आहे. बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्‍टर, दामिनी... अशा काही त्यांच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या मालिकांमुळेच किती तरी कलाकार नावारूपास आलेले आहेत. "मी मराठी' हे अधिकारी बंधूंचे छोट्या पडद्यावरील एक वेगळे पाऊल आहे. कांचन अधिकारी याबाबत म्हणतात, ""चोवीस तास मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी "मी मराठी' ही वाहिनी असावी ही कल्पना मुळात मार्कंड अधिकारी यांची; कारण तसं पाहायला गेले, तर अधिकारी बंधूंचे पहिल्यापासून मराठीवर प्रेम जडलेले आहे. "सब' व जनमत' या स्वतंत्र दोन वाहिन्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळेच "मी मराठी' वाहिनी लॉंच करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चॅनेलच्या प्रोग्रॅम डिझायनिंगची सर्वस्वी जबाबदारी मी उचलली आहे. त्यात एकूण चार वयोगटांचा येथे प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. पहिला गट लहान मुलांचा असेल. दुसरा खास तरुणांसाठी, तिसरा मध्यमवर्गीय माणसांसाठी, तर चौथा वरिष्ठ नागरिकांसाठी. यामध्ये शहरी; तसेच ग्रामीण प्रेक्षकवर्गाचा विचार करण्यात आला आहे.''

No comments: